भैरवी
भैरवी
तू निघालीस
आषाढी एकादशीच्या पालखीसारखी
मी दुरूनच पाहिला
माझ्या हृदयाच्या लक्तरांचा सोहळा
तू सजलेली ...... फुललेली
श्रावणातल्या गुलमोहरा सारखी
मीच विवश .....
भावनांच्या ओतप्रोत किनाऱ्यावर
संपलेल्या जीवनाची गात
भैरवी ...... 🌹🌹🌹🌹🌹
सर्व कविता वाचण्यासाठी click on
www.tamboliimtiaz.blogspot.com
लई भारी राजू
ReplyDelete