Posts

ज्ञानज्योती फातिमा माई

 चोहीकडे अंधारच अंधार           दाटला असताना  बहुजन समाज अज्ञानाच्या खाईत  लोटला असताना  तुम्हीच ठरलात.......  सह क्रांतीज्योती  आणि तेवत ठेवलीत मशाल ज्ञानाची                           शब्दांचा विटाळ होता स्त्रियांना                            तुम्ही माणसात आणलं बायांना                         उपकार तुमचे स्त्री जातीवर शब्दातीत आहेत                           महिलांनी मात्र ठेवायला हवी जाण                           आपल्या भाग्यविधात्यांची .... क्रांतीज्योती सावित्रीबाईंशी  तुम्ही जोडलीत नाळ  अक्षर अक्षर जोडून केली शब्दांची माळ  आणि स्त्री शिक्षणाने लावला  शिक्षण संकल्पनेलाच जाळ  व...

व्हाट्सॲप

 **‌‌. *˜”*°•.˜”*°* *व्हाट्सॲप*  •°”˜.•°” *व्हाट्सअप* *च्या* *दुनियेत*  *आपले कित्येक ग्रुप झाले* *पण प्रत्येक ग्रुपमध्ये तेच ते मेंबर आले* *दुनिया गोल आहे पूर्वी म्हणायचे* *लोक* *व्हाट्सअप चे ग्रुप बघून* *खरं वाटतं हे छातीठोक* *तोच तो मेसेज* *कोरना सारखा सगळ्या ग्रुप वर होतो व्हायरल* *डिलीट केला एका ग्रुप मधून तर दुसरीकडे मिळतं त्याला सरव्हायवल* *व्हाट्सअप च्या दुनियेचा असा सारा मेळ आहे*  *एकमेकांना भेटण्यासाठीच हा सारा खेळ आहे* *कित्येकांना येते शंका कुणाचा* *काहीतरी घोळ आहे*  *मात्र*  *जगातल्या प्रियजनां पर्यंत पोहोचण्याचं व्हाट्सअप हे बोळ आहे* *चाट्स ..स्टेटस ..इमोजी ..स्टिकर्स अशी ही सगळ्यांची भेळ आहे*  *आम्ही कितीही असलो बिझी*  *तरी* *व्हाट्सॲपची चव चाखण्यासाठी सगळ्यांकडे वेळच वेळ आहे* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  * इम्तीयाज मुबारक तांबोळी*               *फलटण*  शुक्रवार- 21 ऑगस्ट 2020 9881452008 माझ्या कविता व लेख वाचण्यासाठी click on www.tamboliimtiaz.blogspot.com 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

भैरवी

                            भैरवी                  तू निघालीस         आषाढी एकादशीच्या पालखीसारखी         मी दुरूनच पाहिला          माझ्या  हृदयाच्या लक्तरांचा सोहळा          तू सजलेली ...... फुललेली        श्रावणातल्या गुलमोहरा सारखी         मीच विवश .....        भावनांच्या ओतप्रोत किनाऱ्यावर          संपलेल्या जीवनाची गात            भैरवी ...... 🌹🌹🌹🌹🌹 सर्व कविता वाचण्यासाठी click on www.tamboliimtiaz.blogspot.com

निर्माल्य

नमस्कार मित्रांनो, या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माझ्या स्वरचित कविता मी या ब्लॉगवर पोस्ट करीत आहे.