ज्ञानज्योती फातिमा माई
चोहीकडे अंधारच अंधार
दाटला असताना
बहुजन समाज अज्ञानाच्या खाईत
लोटला असताना
तुम्हीच ठरलात.......
सह क्रांतीज्योती
आणि तेवत ठेवलीत मशाल ज्ञानाची
शब्दांचा विटाळ होता स्त्रियांना
तुम्ही माणसात आणलं बायांना
उपकार तुमचे स्त्री जातीवर शब्दातीत आहेत
महिलांनी मात्र ठेवायला हवी जाण
आपल्या भाग्यविधात्यांची ....
क्रांतीज्योती सावित्रीबाईंशी
तुम्ही जोडलीत नाळ
अक्षर अक्षर जोडून केली शब्दांची माळ
आणि स्त्री शिक्षणाने लावला
शिक्षण संकल्पनेलाच जाळ
वणवा आता पेटलाय
पन्नास टक्क्यांच्या वाटणी पर्यंत
सावित्रीबाईंच्या ज्ञानज्योती तुम्ही
मात्र उपेक्षित राहिलात
कदाचित चुक आमचीच
समजून घ्यायला तुम्हास खरंच कमी पडलो आम्ही...
इम्तीयाज मुबारक तांबोळी
फलटण
9881452008
माझ्या कविता व लेख वाचण्यासाठी click on
www.tamboliimtiaz.blogspot.com
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Comments
Post a Comment